शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०१६

रामेश्वरम - धनुषकोडी - भाग 3 (अंतिम)


भल्या पहाटे ५.०० वाजता खिडकीतुन येणार्‍या सुर्यदेवाच्या किरणांनी आम्हाला उठवले. पण प्रवासाने शरीरं आंबलेली असल्याने ५ मिनिटं अजुन झोपु म्हणताना ५.३० चा प्लान बी गजर झालाच. मग आन्हिकं आटोपुन गुजराती नाश्ता केला. इकडे तिकडे चौकशी केली आणि धनुष्कोडी ला जायचे ठरवले. तीन नंबर ची बस रामेश्वराच्या मंदिरालगतच थांबा घेते असे कळले. तिथे जाईस्तोवर ३ तीन नंबरच्या बसेस ओवरफ्लो होउन गेल्या होत्या. 

बराच वेळ वाट बघत असता एक रिक्षावाला आम्हाला फिरवायला आला. त्याला म्हटले धनुष्कोडीला टोकावर जायचे आहे तर तिथपर्यंत पोचवायला तयारही झाला . म्हंटले बरे झाले बस ला थांबायला नको आता.  दोनेक किमी गेलो तोच माशी शिंकली रिक्षावाला मधेच म्हणे मी धनुष्कोडीला जाणार नाही. रामेश्वरम फिरवतो तुम्हाला. त्याच्याकडे छोटासा वाद घातल्यावर त्याला म्हंटले तु इथेच उतरव बाबा आम्हाला. आमचं आम्ही बघतो काय ते.  उतरलो तर खरं आजुबाजुला एक रिक्षा, कॅब एवढच काय बस थांबा पण दिसत नव्हता. एकाध दुकानं होती तिथे चौकशी करायला गेलो तर भाषेचा अडसर.  माझी तमिळ पण जेमतेमच. अश्या प्रकारे दिवसाची सुरवात " नल्ला  रोंबा" झाल्याने धनुष्कोडीला आज पोचेन का वेळेत ह्याची खात्री वाटत नव्हती.

  मग अजुन एक रिक्षावाला आला मदतीला म्हणाला ३ नं बस पकडवुन देतो. आणि त्याने खरच एक बस पकडवुन दिली.

धनुष्कोडी रामेश्वरम पासुन २२ कि.मी दूर आहे. इथवर जाणार्‍या रस्त्यात टिपीकल रामेश्वरम - धनुष्कोडीच्या च्या खूप छान "गावच्या गोष्टी" पाहता आणि ऐकताही आल्या. टीपकल झावळ्यांनी शाकारलेली घरं, तिथल गावपण, शाळा, वाटेत  अभयारण्यामुळे लागणारं जंगल  आ,पक्षी  आणि समुद्राची अथांग निळाई सगळंच सुंदर आहे.  हे पहात जाताना २० किमी कधी संपले समजले सुद्धा नाही.

धनुष्कोडीला बस एका चेक पोस्ट पाशी थांबते. तिथुन पुढे  फोर व्हील ड्राईव टेंपो मधुन पुढे जाउ शकता कारण वाळुतुन पुढचा प्रवास असतो.  ह्या टेंपोंचे मालक पीक-सीजन ला कितीही भाडं आकारतात आणि ठराविक पॉईंट्स फिरवतात. अगदी टोकापर्यंत जाण्यासाठी किती मिनतवार्‍या केल्या , तो मागेल तेव्हढे पैसे देउ केले तरी टेंपोवाला तयार होईना. पण आम्हाला तर जायचेच होते.  मग बर्‍याच वेळाने एकजण कबूल झाला.



चेकपॉईंटपासचा मनोरा.







टेंपो पुर्ण भरल्यावर त्याने एका बीचवर नेलं  खूप सुंदर आहेत इथले बीचेस. किनार्‍यालगत उथळ आणि थोडस पुढे खूप खोल.  बरेच लोकं इथे आपल्या आप्तेष्टांच बाराव/ तेरावं/ श्राद्ध वगैरे वाढायला येतात.
हे काही प्र.चि.







तिथे थोडा क्लिकक्लिकाट करुन आम्ही टेंपोजवळ परतत असताना दुसर्‍या टेंपोवाल्याशी आमच्या ड्राईवरच बोलणं ऐकल, जितपत तमिळ समजत त्यावरुन तो आम्हाला गंडवण्याचा प्लान करत होता हे कळल. आता आमचं डोकं फिरलच. जाणार नाही तर आधी कबूलच नाही ना करायचं. आमचं डोकं सटकलं. तिकडून विचारणं झालं  "तुला जायचय ना टोकापर्यंत? जायच का?" मीही होकार भरला आणि त्या टेंपोतुन उतरुन चालु पडलो.

बीच वर विकायला ठेवलेलं
ह्या पुढे धनुष्कोडीला जाणार्‍यांसाठी शुभ वार्ता :धनुष्कोडी चेकपोस्ट ते भारतभूच्या शेवटच्या टोकापर्यंत रस्ता बांधणे सुरु आहे . मे महिन्यात आम्ही गेलो तेव्हा अर्ध काम झालय डिसेंबरपर्यंत ते पुर्णही होईल.  टेंपोचालक-मालक आणि सरकार ह्यांच्यात वाटाघाटी/चर्चा होऊन  मग तो खुला होईल कदाचित. तेव्हा कदाचित तुम्ही तिथे टू-व्हीलर वरुन पण ड्राईव एंजॉय करु शकाल.

मधे मधे मच्छीमारांच्या वस्त्या आहेत. झोपडीकणकणी एक सोलर पॅनल होतं. हे मला भारी आवडलं. 



आता झालं काय १० वाजताच गोव्यात १२ वाजल्यासारखे वातावरण असल्याने मजाक मजाक में कॅप्स, दुपट्टे अश्या बर्‍याच गोष्टी हाटेलात राह्यिल्याच जाणवु लागल होतं. त्यात मी मॅडसारखं स्लीवलेस घातलं होतं.  नाही म्हणायला, गॉग्स, ग्लुकोज, भरपूर पाणी आणि लिम्का अस काय्बाय घेतलं होतं . ते पीत पीत धनुष्कोडीचा निर्मनुष्य किनारा फिरत होतो.  अंगाला अक्षरशः चटके बसले.  धनुष्कोडीच टोक तिथुन आठ-दहा किमीवर होतं. जे कोण वाटेत भेटले(म्हणजे मच्छीमार दादा) त्यांनी वेळो वेळी फक्त २-३ किमी राहिलेत असे सांगुन आमचा हुरुप वाढवला म्हणुन त्यांचे आभार्स

पुढल्या रस्त्यात ठिकठिकाणी घेतलेले फोटो






पुढे हे एक मच्छीमार दादा भेटले. आम्ही वेडे असल्यागत आम्हाला पाहत पुढे गेले.



कधीतरी मेलेलं भल मोठ कासव





शंखोबा












हुरूप वाढवणारा मच्छीमार दादा

दुरवर सुरु असलेल रस्त्याच काम


हे काय टोक जवळच आलय आता



हिंदी महासागर





शांत असा बंगालचा उपसागर
हे आपल शेवटच टोक.

दूरवर बायनोक्युलर मधुन छोटी छोटी बेटं दिसत होती. तीच आपली श्रीलंका असा आम्ही समज करुन घेतला , बराच वेळ ते दृश्य डोळ्यात आणि मनात साठवुन मग परतीला लागलो. अजुन अंदाजे १० एक किमी चालायच होत चेकनाक्याजवळ पोचायला.
खालच्या फोटोत लाल रस्ता दिसतोय तोच भविष्यात डांबरी होणारे.







इथे आधी वस्ती वगैरे होती. जुनं चर्च वगैरे आहे, तिथेच काही कुटुंब शंख शिंपले कैर्‍या वगैरे विकतात, त्याच्याजवळ हे सापडलं.


Add caption

धनुष्कोडी च जुनं चर्च. असा फोटो काढायचा होता राव!!! रस्त्याच काम सुरु होत + पाय भाजत होते . :(
फोटो जालावरुन साभार.
वरच्या फोटोत  आता प्रत्यक्षात अस नाहीये.  ते हिरव गवत दिसतय त्या ठिकाणी अनेक दुकानं थाटलीत लोकांनी




झोपडी विथ सोलर पॅनल

इतक होईस्तोवर आम्ही अंदाजे १३-१४ किमी चाललो होतो. आता पायातली प्रत्येक सेल मी अस्तित्वात आहे हे सांगु लागली होती. त्यात सुर्यराव वरुन आग ओकत होते. तेव्हढ्यात तिथल्या वस्तीतले एक दादा भेटले त्यांनी आम्हाला त्यांच्या २-wheeler  ने एक किलोमिटर भर पुढे नेउन उतरवल.




तिथल फोटो शूट होईस्तोवर रस्त्याच काम करणारी बडी हस्ती भेटली , त्यांनी जीप थांबवली आणि आम्हाला रामेश्वरम ला सोडतो म्हणाले पण ... आम्हाला अजुन एक गोष्ट बघायची होती. मघाशी येताना बसमधुन एक मंदिर दिसल होतं ते तर बघायचच होत. त्या मंदिराजवळ  जाणार्‍या रस्त्याला उतरलो आणि परत चालु लागलो





हे ते कोदंडधारी रामाच मंदिर. इथे रामाने बिभिषणाचा राज्याभिषेक केला होता अशी आख्यायिका आहे. मला तर हे साधसं मंदिर खूप आवडल.



कोदंडधारी मंदिरामागचा view

तिथुन मुख्य रस्त्याला लागुन आपला रंग वगैरे सेल्फीत बघतच होते इतक्यात हापिसातुन फोन आला की आमचा एक कलीग देवाघरी गेलाय. सो मला ट्रीप आवरुन परत यायला लागणार होतं. मी देवाचे आभार मानले की मी धनुष्कोडीला आजच आले. तिथुनच चेन्नै गोवा फ्लाईट बुक केली आणि रेल्वे शोधु लागलो चेन्नै ला जायला . ती आता कुठली मिळायला. मिळेल त्या वाहनाने रामेश्वरम ला पोचुन चेकाउट केल आणि रात्री ८ ला रामेश्वरम-चेन्नै एक्स्प्रेसच्या अनरिजर्वड डब्यात जाउन आसनस्थ झालो.


समाप्तः