शनिवार, २५ सप्टेंबर, २०१०

मी

स्वत:तच गुंतलेली मी
स्वतःलाच शोधणारी मी
क्षणा़क्षणाला नवीन शोधाने
अधिकच व्याकूळ मी...
...नाही आवडत त्यांना हे असे....
म्हण्तात एकुलकोंडी मी...
माणुसघाणी मी
हे ऐकुन , पुन्हा माझ्यातच हरवलेली वेडी मी.....
चाललाय माझा प्रयत्न स्वतःला ओळखण्याचा .....
कळत असूनही अजाण, मूर्ख मी.....
-- (प्रीतमोहर/प्रीमो)