रविवार, ११ जुलै, २०१०

देवा तु चुकलास....

देवा तू चुकलास....

माणसाला बनवताना मन का दिलेस?

सगळं साठवण्याची  कुवत का दिलीस?

टोचत रे खूप आत्ता.....सहन होत नाही

मन दिलेस ते दिलेस.....भावना ही दिल्यास

आत्ता लहान सहान गोष्टींतले...हेतू कळतात...

न कळते तर बरं झालं असतं....

आता केलीस ती चूक केलीस

पुन्हा मात्र चुकू नकोस.....

माणसासारखा बनू नकोस....


माणूस काय...... मुखवटाधारी

काय खरे काय खोटे कैसे समजावे म्या पामरी

मला वाटत तुला सुद्धा प्रश्न पडत असेल कधीतरी ,

की ज्याला निर्मिला  मी ,तो मानव आहे का 'तोच ' तरी?

पुढच्या वेळेला सृष्टी निर्मिताना हे सार लक्षात ठेव....

काहीच  innovative  नाही जमल तर मन , भावना , हे "parts " manufacture  करताना असले फौल्ट्स बाजुला ठेव.... एका चेहर्‍यावर दुसरा चेहरा.....हे सगळ मला नवीनच होत
जेव्हा कळल तेव्हा "नात्या"वर विश्वास ठेवण कठीण होत
सरडा सुद्धा इतक्या चटचट रंग नसेल बदलत
जितका सत्वर तुझा हा मुखवटाधारी असतो बदलत.....
विश्वासावरचा विश्वास उडून गेलाय
तितक्यात कोणीतरी बोलल, तो ना ,कधीचाच मरुन गेलाय.....
प्रत्येक नात्यातला स्वार्थ मज भासे
आणि मग म्हणते....
देवा तु चुकलास......


अगदी काल - परवा पर्यंत 'तो' कित्ती गोड वागत होता....
आणि आज....
आज सगळे 'संदर्भ ' उलते भासतात....
जीवाला जीव देईन जिथे तुझा जीव घेईन बनत......
काय उरला रे " त्या " माया-ममतेला अर्थ?
हे अस सगळ आता सोसवत नाही
दुसरा भोगतो ते ही पहावत नाही...
आणि मग म्हणते....
देवा तु चुकलास......