शुक्रवार, ५ नोव्हेंबर, २०१०

माझ्या बालपणीची दिवाळी(गोव्याची)

माझी दिवाळीची तयारी तशी दिड महीना अगोदरच सुरु होत असे. अस काय बघताय? अहो खरच!!! आता पुढच ऐका म्हणजे कळेल. म्हण्जे बघा हं. सरस्वती पुजन, दसरा इ. मुळे परिक्षा लाबुन दिवाळीच्या १-२ दिवस अगोदर संपे आणि त्यामुळे मग खर्या तयारीला वेळच नसे. तर माझी तयारी म्हंजे कशी बघां हं. बाईंनी शाळेत दिलेल्या गृहपाठासोबत परिक्षेचा अतिरिक्त अभ्यास आणी बाईंनी न शिकवलेले धड्याम्चाही अभ्यास: १५ दिवस म्हंजे परिक्षेकडे टेंशन नसे.. आई प्रश्न विचारी उत्तर येतात हे बघुन तिला मला खेळण्यास पर्मीशन द्यावीच लागे :ड


दिवाळीला १ महीना असताना आम्ची म्हंजे बच्चे कंपनीची जोरदार तयारी सुरु होई? अहो कसली काय? नरकासुर बनविण्याची. आमच्या गोव्यात नरकचतुर्दशी दिवशी नरकासुराचे दहन करण्याची पद्धत आहे.

 आता मी बच्ची कंपनी म्हंटल म्हणुन अगदीच बच्चे नाहीत हं अगदी कॊलेजात जाणारी मुल-मुलींपर्यन्त सगळे एकत्र येत असु आम्ही.


सगळ्यात आधी नरकासुराची थीम ठरवली जाई.मग त्या थीमनुसार काय काय साहित्य लागेल याची यादी  काढुन त्याच्या खर्चाचा अंदाज काढला जाई आणि त्यानुसार कॊलनीवाल्यांकडुन किती वर्गणी घ्यायची हे ठरे.पण वर्गणी कधीच १० रु च्या वर नाय गेली.:)

तर ह्यानंतर कोणी कोणी काय काय करायच हे ठरे..म्हंजे वर्क डेलिगेशन हो :ड. मी नेहमीच मुखवटा बनवणार्यांच्या गटात असे.. हे झाल्यावर आम्ही  आपल्या आपल्या कामाला लागत असू. म्हणजे वर्गणी गोळा करणारे आपल्या कामाला लागत. गोणपाट गवत, बांबू इ. १ गट गोळा करत असे.


आमचे काम अगदी त्या दिवसापासुन सुरु होई. सगळ्यात आधी चलो मैदान असे मिशन सुरु करुन दगड गोटे व धोंडे आणि माती जवळ करायची. य्यामुळे अस्मादिकांचा चिमुकला जीव फ़ार्फ़ार दमत असे.

मग दे दगड एका टिप्पेकल पद्धतीने मांडायचे. त्यावर माती कालवुन थापायची. हे करण्यात मी नं १ असे. तिथे थापता थापता इतरांना ही लोळवायला मिळत असे ना :) पण जोक्स अपार्ट. हे जरा किचकटीच काम कारण गाल, हनुवटी , कपाळ यांचे उंचवटे तस्सेच आले पाहिजेत उठावदार. मग अजुन काही थीमनुसार फ़ीचर्स असतील चेहर्याची तर ती ही आली पाहीजेत. मग एकदा हे झाल की की तोंड सुकु द्यायच २ दिवस.

मग चिकी करायची . चिकी म्हण्जे मैद्यात पाणी घालुन शिज्वुन तयार झालेला पदार्थ. हा चिक्कट अस्तो म्हणुन चिकी. आता त्या मातीच्या तोंडावर चिकीचा मस्त लेप द्यायचा त्यावर वर्तमान्पत्राच्या कागदाच्या तुकड्यांचे थर लावायचे व वाळु द्यायचे. दुसर्या दिवशी दुसरा थर . असे ८-१० दिवस करुन हे कडकडीत वाळवायचे. मग हे सावक्लाश काढुन त्याच्या कडा नीट कापुन रंग द्यायचा नि वाळवायचा झाले तोंड तयार..


दरम्यान दुसरे गटही आपापली काम आटोपायचे. आणि मग नरकासुरावर शेवटचा हात फ़िरायचा. ह्या दिवसात घरात कित्ती गोंधळ व्हायचा माहीताय? परिक्षा ना तेव्हाच....पण .पोर सगळ म्यानेज करायची हो.


आता नरकचतुर्दशी दिवशी त्याला गावभर फ़िरवुन मग पहाटेला दहन केल्यावरच मग आम्ही घरी परतत असु. मिरवणुकीत मस्त सजवलेली श्रीकृष्णाची मुर्ती सुद्धा असते. बरका !!!आई दाराशी आरतीच्या तबकासहीत वाट बघत असायची.घरात घेताना आई कारीट फ़ोडायला लावायची. मग ओवाळुन घरात घ्यायची . त्यानंतर मला व बाबांना तेल उटण्याच मालीश व कडकडीत पाण्याची अंघोळ..... नंतर मग मुळ घरी जाउन पोहे खाण. आमच्याकडे हा पोह्यांचा कार्यक्रम असतो ...तर्हेतर्हेचे पोहे केले जातात ताकाचे, गुळाच्गे, फोडणीचे, पोह्यांची खीर आणि सोलकडीचे पोहे. इत्यादी. आणि आमच्या भटवाडीतले सगळे लोक सगळ्यांच्या घरी पोहे खातात. माझी आज्जी म्हणे दिवाळीच्या दिवशी पोहेच खायचे अस्ते म्हणे

असो....गेले ते दिन .......


आज नोकरीमुळे ही मज्जा , आनंद अज्जिबात अनुभवता येत नाहीए.....पण काही फ़ोटो तुमच्यासाठी मुद्दाम काढलेले: